-->

अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री : दोन व्यक्तींना अटक

अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री : दोन व्यक्तींना अटक

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री : दोन व्यक्तींना अटक


कारवाईत 6 लक्ष 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


वाशिम,  :  अमरावती विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागीय उप आयुक्त अ.ना.ओहोळ आणि वाशिमचे राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलूबाजार ते कारंजा रोडवर अवैधरित्या बनावट विदेशी दारुची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क,वाशिमच्या पथकाने 25 ऑक्टोबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील मौजे तऱ्हाळा शिवारातील श्री.हनुमान मंदीराजवळच्या रोडवर एका हुंदाई कंपनीच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच-43-आर-3318 या वाहनात बनावट विदेशी दारु रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 240 सिलबंद बाटल्या, बनावट एम्पेरीयल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 240 बाटल्या तसेच 750 मिली क्षमतेच्या बॉम्बे रॉयल व्हिस्कीच्या 48 सिलबंद बाटल्या गोवा राज्यात विक्रीस असलेल्या परंतू महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेला विदेशी मद्य तसेच बनावट विदेशी दारु तयार करण्याकरीता लागणारे झाकणे व लेबल तसेच 180 मिली क्षमतेच्या रिकाम्या बाटल्या इत्यादीसह एकूण 6 लक्ष 80 हजार 166 रुपये किंमतीचा मुद्देमाल अकोला जिल्हयातील बार्शीटाकळी तालुक्यातील साखरविरा येथील नितेश राठोड व सावरसिंग जाधव यांच्याकडून जप्त करण्यात आला. या दोघांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 व भारतीय दंड संहिता कलम 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गोपीनाथ पाटील, मंगरुळपीरचे राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण, वाशिमचे दुय्यम निरीक्षक के.डी. वराडे,अकोला व वाशिम राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक कांबळे व त्यांचे सहकारी के.ए.वाकपांजर,निवृत्ती तिडके, स्वप्नील लांडे,बाळु वाघमारे,नितीन चिपडे,दिपक राठोड,ललित खाडे, विष्णू म्हस्के,दिपक वाईकर,संजय मगरे यांचा या कारवाईत सहभाग होता.याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक गोपीनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहे.



0 Response to "अवैधरित्या बनावट विदेशी दारुची विक्री : दोन व्यक्तींना अटक"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article