-->

फिट इंडिया मोहिम  विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी व्हावे  शिक्षण व क्रीडा विभागाचे आवाहन

फिट इंडिया मोहिम विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी व्हावे शिक्षण व क्रीडा विभागाचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

फिट इंडिया मोहिम

विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी व्हावे

शिक्षण व क्रीडा विभागाचे आवाहन


वाशिम,  :  केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने २०२१ या वर्षात फिट इंडिया क्विझ सुरु केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया मुव्हमेंट या योजनेची घोषणा केली आहे. या उद्देशाने प्रत्येकाने जीवनात सदृढ राहावे. फिट इंडियाअंतर्गत राष्ट्रीय क्विझ स्पर्धा शाळास्तरावरुन घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे स्वरुप प्राथमिक, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर आहे. इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील कमीत-कमी दोन खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग होणे आवश्यक आहे.


ही स्पर्धा नॅशनल टॅलेंट एजन्सी घेत असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रीयस्तरावर विजेत्या संघास सुवर्ण संधी असुन सेलेब्रेटीसोबत खेळाडूची लहान वयात भेट होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यास निश्चित मदत होईल.


या मोहिमेअंतर्गत एकुण ३ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी शाळांना मिळणार आहे. त्यापैकी खेळाडूंना २ कोटी ५ लक्ष व शाळांना २५ लक्ष रुपयांचे पारीतोषिके मिळणार आहे. उर्वरीत निधी व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणार आहे. या वर्षीचे थिम स्वच्छ भारत- स्वास्थ भारत असुन ४.४ फिट इंडिया मोबाईल अॅपवर विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. फिट इंडिया २०२३ क्विझसाठी शाळांनी जास्तीत-जास्त नोंदणी करण्यासाठी fitindia.nta.ac.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. काही अडचणी असल्यास ०११-४०७५९०००/६९२२७७०० या क्रमाकांवर मॅसेज किंवा कॉल करावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी  कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले आहे.



0 Response to "फिट इंडिया मोहिम विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषामध्ये सहभागी व्हावे शिक्षण व क्रीडा विभागाचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article