-->

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  वेळापत्रक जाहीर

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

वेळापत्रक जाहीर


वाशिम,  :  भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.


प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे - 27 ऑक्टोबर 2023, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023, विशेष मोहिमेचा कालावधी - मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे 5 जानेवारी 2024 तसेच 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर व 26 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व मतदार केंद्रावर विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.


विशेष मतदार नोंदणी शिबीरांमध्ये विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या महिला व घर नसलेले भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे यांनी दिली.



0 Response to "मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम वेळापत्रक जाहीर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article