-->

कै . मधुकरराव तुकारामजी वानरे यांचे मरणोत्तर नेत्रदान

कै . मधुकरराव तुकारामजी वानरे यांचे मरणोत्तर नेत्रदान

 


साप्ताहिक सागर आदित्य 

कै . मधुकरराव तुकारामजी वानरे यांचे मरणोत्तर नेत्रदान ८०  शिरपूर जैन  येथील मनिषा अभयकूमार गुंगे यांचे वडिल स्व . मधुकरराव तुकारामजी वानरे   निधन झाले . त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण वानरे कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या कै . मधुकरराव तुकारामजी वानरे यांचे निधन झाल्याने संपुर्ण वानरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना वानरे कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर नेत्रदान करुन दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा आश्विनी योगेंद्र विश्वंभर , मनिषा अभयकूमार गुंगे याच्यांकडे व्यक्त केली त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . अनिल कावरखे , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . खेळकर नेत्र शल्यचिकित्सक , डॉ . बेदरकर , डॉ . पूरी , यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी  ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक   रमेश ठाकरे यांनी स्व . मधुकरराव तूकारामजी वानरे यांची नेत्र बुबूळे काढली व नेत्र बुबूळे त्याच दिवशी गणपती नेत्र रुग्णालय जालनाकडे पाठविण्यात आली . तरी सदरील नेत्रदान करण्याकरीता आश्विनी योगेंद्र विश्वंभर ,  योगेंद्र विश्वभंर , मनिषा अभयकुमार गुंगे , दिलीप विश्वंबर , संजय विश्वंबर , नंदु विश्वंबर , योगेंद्र विश्वंबर व सागर विश्वंबर यांचे सहकार्य लाभले . 1 तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ . अनिल कावरखे यांनी केले असुन वानरे कुटूंबाचे आभार मानले आहेत . नेत्रदानासाठी संपर्क क्रं . ९९ २२५१ ९९ ४८ ( जि.रु. वाशिम ) ACB जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय वाशिम

0 Response to "कै . मधुकरराव तुकारामजी वानरे यांचे मरणोत्तर नेत्रदान "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article