-->

ग्लोबल कॉन्फरन्स:-२०२३ या जागतिक परिषदेसाठी प्रा. राजेश पाटिल ताले यांची निवड

ग्लोबल कॉन्फरन्स:-२०२३ या जागतिक परिषदेसाठी प्रा. राजेश पाटिल ताले यांची निवड



साप्ताहिक सागर आदित्य 

ग्लोबल कॉन्फरन्स:-२०२३ या जागतिक परिषदेसाठी प्रा. राजेश पाटिल ताले यांची निवड


दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या G-20 परिषदेनंतर आता मुंबईत 

ग्लोबल कॉन्फरन्स-२०२३ होणार आहे.या परिषदेसाठी जवळपास ४० देशातील प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत तसेच पूर्ण भारत देशातून १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.या परिषदेसाठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युथआयडॉल,युवाव्याख्याते प्रा.राजेश पाटिल ताले यांची निवड पूर्ण विदर्भ विभागातून करण्यात आलेली आहे.

स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून प्रा.राजेश पाटिल ताले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासून  अकोला-वाशिम जिल्ह्यात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्य करीत आहेत,त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल ग्लोबल कॉन्फरन्स:-२०२३ या जागतिक परिषदेसाठी प्रा.राजेश पाटिल ताले यांची निवड करण्यात आलेली आहे.या परिषदेमध्ये शिक्षण,आरोग्य,कृषी,पर्यावरण संवर्धन,रोजगार आणि आर्थिक सक्षमता या विषयांवर चर्चा होणार आहे.सुदृढ समाजनिर्मिती करून सशक्त जागतिक महासत्ता आपला देश बनविण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे .

दि.३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हे तीन दिवस ही ग्लोबल कॉन्फरन्स:-२०२३ ही परिषद मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे आयोजित करण्यात आलेली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

प्रा.राजेश पाटिल ताले या परिषदेमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करणार आहेत हे आपल्या स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन साठी व पूर्ण अकोला जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.


Related Posts

0 Response to "ग्लोबल कॉन्फरन्स:-२०२३ या जागतिक परिषदेसाठी प्रा. राजेश पाटिल ताले यांची निवड"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article