-->

प्रा.राजेश पाटिल ताले  ग्रीनलँड कॉटेज अकोला येथे  आरोग्य परिसंवाद (अकोला

प्रा.राजेश पाटिल ताले ग्रीनलँड कॉटेज अकोला येथे आरोग्य परिसंवाद (अकोला



साप्ताहिक सागर आदित्य 

महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रा.राजेश पाटिल ताले  ग्रीनलँड कॉटेज अकोला येथे  आरोग्य परिसंवाद (अकोला-वाशीम-

बुलढाणा) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्यावतीने तसेच मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आरोग्य परिसंवाद महाराष्ट्र शासन व जकारिया फाऊंडेशन च्या माध्यमातून राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून 

 मंगेश चिवटे

(विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष व विशेष कर्तव्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय) आणि महाराष्ट्र वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाची पूर्ण टीम तसेच अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक/सामाजिक/आरोग्य/राजकीय क्षेत्रातील मान्यवरमंडळी उपस्थित होते. कार्यक्रमात अकोला,बुलढाणा,वाशीम,

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक/शैक्षणिक/आरोग्य इ.क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरमंडळींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष, युवाव्याख्याते प्रा. राजेश पाटिल ताले यांना गेल्या १० वर्षांपासून पश्चिम विदर्भात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल  मंगेश चिवटे(विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष  व विशेष कर्तव्य अधिकारी  मुख्यमंत्री सचिवालय) यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिकटे यांनी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन करीत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन ला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले.जावेदजी जकारिया आणि जकारिया फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



Related Posts

0 Response to "प्रा.राजेश पाटिल ताले ग्रीनलँड कॉटेज अकोला येथे आरोग्य परिसंवाद (अकोला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article