-->

महारेशीम अभियानाचा वाशिम येथून   शुभारंभ

महारेशीम अभियानाचा वाशिम येथून शुभारंभ

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महारेशीम अभियानाचा वाशिम येथून 

शुभारंभ


वाशिम, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार रेशीम शेती व त्या आधारीत पुरक उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.रेशीम शेती व उद्योग विकास प्रचार प्रसिद्धी योजनेला मान्यता शासनाने दिलेली आहे.राज्यात महारेशीम अभियान राबविण्यासाठी शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.या महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत रेशीम रथ तयार करुन गावो गावी रेशीम शेतीबद्दल प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.२० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत रेशीम उद्योग योजना राबविण्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.


         महारेशीम अभियान २०२४ रेशीम रथाचे उद्घाटन आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांचे शुभहस्ते रेशीम रथाला हिरवा झेंडी दाखवुन करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच नायब तहसीलदार श्रीमती पुरोहित तसेच रोहयो विभागातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

 

        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना रेशीम संचालनालयासह कृषी विभाग व पंचाय विभाग मार्फत राबविण्यात येणार आहे.  मुळे यांनी कृषी विभागाच्या बैठकीत सर्व तालुका कृषी अधिकारी यांना रेशीम योजना रेशीम विभागाच्या समन्वयाने राबविण्याचे निर्देश दिले.

         जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी रेशीम उद्योग योजनेचा मनरेगा अंतर्गत लाभ घ्यावा व  आर्थीक उन्नती करावी असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनील फडके  यांनी

केले.

0 Response to "महारेशीम अभियानाचा वाशिम येथून शुभारंभ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article