-->

गोवर रुबेला उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना  जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

गोवर रुबेला उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

 


साप्ताहिक सागर आदित्य 

गोवर रुबेला उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना

जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न

       वाशिम,  : गोवर रुबेला उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना व SAANS Campaign बाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा झाली. या सभेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य डॉ. संगीता देशमुख, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.जाधव यांचेसह शिक्षणाधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, युनिसेफ सल्लागार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी  तसेच आरोग्य विभागातील संबंधीत अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

         गोवर रुबेला लसीकरण मोहीमची पहिली फेरी १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२२ व दुसरी फेरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येणार आहे. गोवर रुबेला आजाराचे दुरीकरणासाठी ३ महत्वाच्या निर्देशांकाबाबत श्रीमती पंत यांनी सुचित केले आहे. यात गोवर रुबेला दुसऱ्या डोसचे लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्क्यापेक्षा जास्त साध्य करणे. गोवर रुबेला लसीच्या दोन्ही डोसमधील शून्यपर्यंत Drop out rate आणणे. आणि Non measles, Non rubella discard rate प्रति लाख लोकसंख्येमध्ये २ किंवा २ पेक्षा जास्त साध्य करणे. गोवर रुबेला उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजनेबाबत या समिती सभेमध्ये चर्चा करण्यात आली.

        यावेळी डॉ कोरे यांनी जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहीमेची पहिली फेरी यशस्वीपणे राबविण्यात आल्याबाबतची माहिती दिली. लसीकरण फेरीदरम्यान गोवर रुबेला पहिला डोस २९५ बालकांना व दुसरा डोस ३१७ बालकांना देण्यात आल्याचे सांगितले.

         राज्यस्तरीय प्राप्त मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात SAANS Campaign १२ नोव्हेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान राबवावयाची असुन पुढील उदिष्टे साध्य करण्याचे निर्देश दिले आहे. National Childhood Pneumonia Management 2019 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे. बालकांमधील न्युमोनियाचा प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सामाजिक स्तरावर जनजागृती करणे. न्युमोनिया आजार ओळखण्याबाबत पालकांना व काळजी वाहकांना सक्षम बनविणे. न्युमोनिया आजारास गंभीरपणे घेण्यासाठी तसेच वेळेत उपचार/काळजी घेण्यासाठी न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दुर करुन पालकांच्या वर्तणुकीत बदल करणे. न्युमोनिया नाही तर बालपण सही या घोषवाक्यचा वापर SAANS Campaign मध्ये करणे. PCV लस व न्युमोनिया विषयी जनसमुदायामध्ये जनजागृती करणेबाबत आराखडा तयार करण्याबाबत या सभेत सांगण्यात आले.



Related Posts

0 Response to "गोवर रुबेला उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article