
येणाऱ्या पाच वर्षात बोर्डी - कोल्ही गावाचा कायापालट करणार- सरपंच तुळशीराम चव्हाण
साप्ताहिक सागर आदित्य बोर्डी- कोल्ही ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच तुळशीराम रामकिसन चव्हाण यांनी येत्या पंचवार्षिक मधे
गावाच्या विकासाकरिता अनेक योजना राबविण्याचे वचन गावकऱ्यांना दिले असून या योजना राबविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे साप्ताहिक सागर आदित्य बोलताना व्यक्त केले मत - कोल्ही - बोर्डी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच तुळशीराम चव्हाण हे मागील पंचवार्षिक मधे सुद्धा सरपंच होते . त्यांनी या वर्षीही गावामध्ये निवडणूक लढवली असून त्यांच्या पॅनलचे सात पैकी चार सदस्य आणि स्वतः सरपंच यांना भरघोस मतांनी गावकऱ्यांनी निवडून दिले आहे . त्यांनी त्यांच्या मागील , असून त्यामध्ये रस्ता खडीकरण , रपटा बांधकाम , स्मशानभूमी शेड , स्मशानभूमी अंतर्गत रस्ता , गावात सिमेंट रोड , दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रोड , सार्वजनिक विहिरीवर लोखंडी जाळी , अंडरग्राउंड नाल्या , पाईपलाईन , वृक्ष लागवड , जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत शालेय उपयोगी साहित्य खरेदी अंगणवाडी केंद्राला खेळणी , कोरोना काळात गावातील लोकांना सहकार्य व मदत गावालगतच्या नाल्याचे खोलीकरण शेतकरी मेळावे . अनेक योजना काळात टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा राबविल्या प्रकारचे विविध योजना राबविल्या असून त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या पाच वर्षाच्या काळात शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांनी स्वतः व कुटुंबीयांसाठी घेतला नाही • हे विशेष . तसे त्यांनी पारदर्शक व्यवहार केला असून भ्रष्टाचाराचा छदामही त्यांनी मिळवला नाही त्याचप्रमाणे गावांमध्ये अतिशय उत्कृष्ट व आदर्श असे ग्रामपंचायत भवन बांधून संपूर्ण तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट ग्रामपंचायत भवन बांधण्याचा सन्मान सुद्धा त्यांना मिळाला आहे . यापुढील कार्यकाळात त्यांनी गावामध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आणण्याचे वचन गावकऱ्यांना दिले आहे पांदण रस्ते , व्यक्तिगत लाभाच्या योजना , घरकुल सार्वजनिक शौचालय सिंचन विहिरी , यासह गावामध्ये नियमित , सार्वजनिक शौचालय , कोल्ही ते येणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम पुन्हा करून त्यांची उंची वाढवणे . गावातील जिल्हा परिषद शाळ डिजिटल करणे तसेच शुद्ध पाण मिळवण्यासाठी गावात आर अ प्लांट सुरू करणे ) सामाजिक सभागृहाची बांधणी करणे महिल बचत गटाच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध करून देणे युवकांसाठी व्यायाम शाळा बांधणे गावातच रोजगार माहिती केंद्र उभारणे नियमित ग्रामसभा घेऊन त्या माध्यमातून शासनाच्या योजन प्रत्येक गांवकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ शेवटच्या घटकां पर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या पंचवार्षिक काळामध्ये आपण प्रामाणिकपणे करणार असल्याचे सरपंच तुळशीराम चव्हाण यांनी मत व्यक्त केले
0 Response to "येणाऱ्या पाच वर्षात बोर्डी - कोल्ही गावाचा कायापालट करणार- सरपंच तुळशीराम चव्हाण "
Post a Comment