-->

वाशिम पंचायत समितीच्या वतीने 'स्वच्छता रन' चे आयोजन

वाशिम पंचायत समितीच्या वतीने 'स्वच्छता रन' चे आयोजन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिम पंचायत समितीच्या वतीने 'स्वच्छता रन' चे आयोजन

 स्वच्छते हीच सेवा अतर्गत लोक जागर!


'स्वच्छता हीच सेवा' या अभियानातअंतर्गत राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'स्वच्छता पंधरवडा' साजरा केला जात असून आज पंचायत समिती वाशिमच्या वतीने "स्वच्छतारन" उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर स्वच्छता रन या जन जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

वाशिम गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी सुरुवातीला उपस्थित सर्व विद्यार्थी, कर्मचारी, लोक कलावंतांना स्वच्छतेची शपथ दिली आणि 'स्वच्छता रन' ला हिरवी झंडी दाखवली.

पंचायत समिती  सभापती सावित्रीबाई वानखेडे, जिल्हा स्वच्छता मिशनचे राम श्रृंगारे, सुमेर चानेकर, विस्तार अधिकारी लोखंडे यांच्यासह पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांची यावेळी उपस्थिती होती.

पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय या २ किमी अंतराच्या या स्वच्छता रनमध्ये जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, लोकलावंत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत स्वच्छतेचा जागर केला.

या स्वच्छता रन दरम्यान जिल्ह्यातील लोक कलावंतांनी  विविध गिते सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. संत गाडगेबाबांच्या भुमीकेत आलेल्या पी. एस. खंदारे यांनी "गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला" या गीताच्या माध्यमातून स्वच्छतेचे कीर्तन सादर केले. साखरा येथील अटल बाहारी वाजपेयी या आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षक दिगांबर घोडके यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी सगळ्यांनी स्वच्छतेची कास धरावी असे आवाहन आपल्या पोवाड्यातुन केले. 

शाहिर उत्तम ऊर्फ धम्मानंद इंगोले,  माजि जि. प. सदस्य शाहिर केशव डाखोरे, लोककवि विलास भालेराव, प्रज्ञानंद भगत,  वाशिमची लता मंगेशकर अशी ओळख असलेल्या  सुशिलाबाई घुगे, किर्तनकार विद्याताई भगत, कवि गायक मधुकर ऊर्फ कविनंद गायकवाड, शाहिर खडसे या एकाहुन एक सरस कलावंतानी आपल्या कलेच्या माध्यमातुन  स्वच्छतेबाबत लोक जागर केला.

ग्रामसेवक संजय नवघरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Posts

0 Response to "वाशिम पंचायत समितीच्या वतीने 'स्वच्छता रन' चे आयोजन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article