
रमाई आवास घरकुल (शहरी) योजना नगरपरिषदकडे प्रस्ताव सादर करावे
साप्ताहिक सागर आदित्य
रमाई आवास घरकुल (शहरी) योजना
नगरपरिषदकडे प्रस्ताव सादर करावे
वाशिम, : रमाई आवास घरकुल (शहरी) योजना 9 मार्च 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रमाई आवास घरकुल (शहरी) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचा जातीचा दाखला, रेशन कार्ड, 3 लक्ष रुपयापर्यंतचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, 7/12 चा उतारा, पि.आर. कार्ड, विद्युत देयक, मतदान ओळख पत्र, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतले नसल्याचे हमी पत्र आणि 15 मार्च 2016 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून विहित नमुन्यात प्रस्ताव आपल्या जवळच्या नगरपरिषद/पंचायतकडे सादर करावा.
अधिक माहितीसाठी व अर्ज मिळण्याकरीता जवळच्या मुख्याधिकारी, नगरपरिषद/पंचायत (सर्व) किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,वाशिम यांच्याकडे संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.
0 Response to "रमाई आवास घरकुल (शहरी) योजना नगरपरिषदकडे प्रस्ताव सादर करावे"
Post a Comment