-->

जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला ; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते !

जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला ; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते !


साप्ताहिक सागर आदित्य/

जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला ; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते !

अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षकांकडे असलेल्या कृषी व पशुसंवर्धन खात्यात गुरूवारी आपसी बदल झाला असून, आता उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांचेकडे शिक्षण व आरोग्य खाते आले आहे

वाशिम - अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षकांकडे असलेल्या कृषी व पशुसंवर्धन खात्यात गुरूवारी  आपसी बदल झाला असून , आता उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांचेकडे शिक्षण व आरोग्य खाते आले आहे . सभापती सुरेश मापारी यांच्याकडे पूर्वीचेच अर्थ व बांधकाम तर सभापती वैभव सरनाईक यांच्याकडे कृषी व पशुसवंर्धन खाते सोपविण्यात आले . जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर , ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेतून सभापतींचे खातेवाटप करण्यात आले . सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते . अडीच वर्षांपूर्वी अर्थ व बांधकाम खाते शिवसेनेकडे ( उद्धव ठाकरे गट ) तर काँग्रेसकडे शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन असे दोन खाते होते . अर्थ व बांधकाम , शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या तीन विषय समितींपैकी कोणती समिती कोणाला मिळते , समितीत बदल होणार की जैसे थे परिस्थिती राहणार ? याची शिगेला पोहचलेली उत्सुकता गुरूवारी संपुष्टात आली . कोणत्या पक्षाला कोणती विषय समिती द्यावयाची याचा अडीच वर्षांपूर्वीचाच फॉर्म्यूला यावेळीही कायम राहिला . मात्र , काँग्रेसच्या वाट्यावर असलेल्या विषय समितीत बदल झाला . यापूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे कृषी व पशुसंवर्धन खाते तर सभापतींकडे शिक्षण व आरोग्य खाते सोपविले होते . हाच फॉर्म्यूला कायम राहिल की यामध्ये बदल होईल , याबाबत बरीच चर्चा रंगली होती . मागील पाच वर्षे शिक्षण व आरोग्य खाते सांभाळल्याने या खात्याविषयी उपाध्यक्ष चक्रधर गोटे आग्रही असल्याचे सांगण्यात येत होते . दुसरीकडे वैभव सरनाईक यांनादेखील शिक्षण व आरोग्य खाते देऊन आणखी पशुसंवर्धन , समाजकल्याण , महिला व बालकल्याण , स्थायी , जलसंधारण अशा एकूण १० विषय समिती आहेत . या समित्यांमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्यांची वर्णी लागते . अडीच वर्षानंतर काही सदस्य सभापती झाल्याने त्या त्या समितीमधील त्यांची जागा रिक्त झाली आहे . या जागेवर यापूर्वीच्या सभापतींना सदस्य म्हणून संधी देण्यात आली .

Related Posts

0 Response to "जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला ; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते !"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article