
महा आवास अभियानात वाशिम जिल्हा विभागात दुसरा प्रकल्प संचालक किरण कोवे यांचा आयुक्तांच्या हस्ते गौरव
महा आवास अभियानात वाशिम जिल्हा विभागात दुसरा
प्रकल्प संचालक किरण कोवे यांचा आयुक्तांच्या हस्ते गौरव
वाशिम
महा आवास अभियान- ग्रामिण अंतर्गत विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल वाशिम जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला असुन याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांना पुरस्काराने अमरावती येथे (दि.20) विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात घरकुलाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्याची दखल विभागीय पातळीवर घेण्यात आली असुन वाशिम जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा दोन अंतर्गत महा आवास अभियान विभाग स्तरीय व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी जि. प. अध्यक्ष ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांच्यासह प्रकल्प संचालक कोवे यांना विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आमंत्रित करण्यात आले होते. विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते प्रकल्प संचालक किरण कोवे आणि जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त चार ग्राम पंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची संख्या विभागात सर्वाधिक आहे. याची दखल शासनाने घेतली असुन विभाग स्तरावर जिल्हा व ग्राम पंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे अंतर्गत उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सुधिर खुजे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) सचिन गटलेवार, डाटा एन्ट्री ऑपरेटर गणेश कव्हर, प्रोग्रामर अश्विनी उजवणे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील 4 ग्राम पंचायतींना सर्वोत्कृष्ट पुरस्कार!
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण टप्पा दोन मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या वाशिम तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांना विभागीय आयुक्त कार्यालयात निमंत्रित करुन पुरस्कार बहाल करण्यात आला. अनसिंग ग्राम पंचायतीचे सरपंच खंडारे, अडोळी ग्राम पंचायतीचे सरपंच सविता ईढोळे, ग्राम विकास अधिकारी व्हि के भगत, ग्रामविकास अधिकारी एम पी बोडखे, टणका ग्राम पंचायतीचे सरपंच शरद गोदारा, सचिव अरविंद पडघान, ब्रम्हा ग्राम पंचायतीचे सरपंच आशाबाई मुसळे, ग्रामसेवक अरविंद पडघान यांचा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर ग्राम पंचायतींनी गावातील सर्व पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ देऊन लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले. त्याबद्दल ग्रामस्थांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "महा आवास अभियानात वाशिम जिल्हा विभागात दुसरा प्रकल्प संचालक किरण कोवे यांचा आयुक्तांच्या हस्ते गौरव"
Post a Comment