
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अगोदर मदत जमा करा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अगोदर मदत जमा करा - शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष रिसोड मालेगाव तहसीलदार यांना निवेदन
संपूर्ण जिल्हात जुलै, औगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये पाण्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान केले होते, आणि परतीच्या पाऊसाने सुद्धा मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झालेले आहे, अजूनही कुठलाच अधिकारी आमच्या बांधावर आलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसटून गेला, जिल्ह्यामध्ये सोयाबीन तूर व इतर पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, सरकारकडून कृषी मंत्री यांनी सुद्धा जिल्हा दौरा केला आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, आणि सरकारकडून मदत देखील जाहीर झाली, परंतु ती मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, म्हणून ती मदत दिवाळी अगोदर त्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी निवेदन द्वारे मागणी ओम वाघ पाटील संघर्ष शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष रिसोड यांनी केली आहे, तसेच मालेगाव तालुक्यातील जी मंडळी अतिवृष्टी पासून वगळल्या गेलेली आहेत, त्यांना सुद्धा समाविष्ट करून घ्यावे असे निवेदनामध्ये नमूद केले आहे..
0 Response to "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अगोदर मदत जमा करा"
Post a Comment