
रासेयो स्वयंसेवकांद्वारे माधव नगर परिसरातील प्लास्टिक व कचरा निर्मूलन (जाधव महाविद्यालयाचे उपक्रम)
साप्ताहिक सागर आदित्य
रासेयो स्वयंसेवकांद्वारे माधव नगर परिसरातील प्लास्टिक व कचरा निर्मूलन
(जाधव महाविद्यालयाचे उपक्रम)
स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत माधवनगर परिसरातील प्लास्टिकचे विल्हेवाट व कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर पद्मानंद तायडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाची आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रुक्के यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
एक ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधी दरम्यान स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कार्यक्रम राबविण्याची निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील 150 स्वयंसेवकांनी 25 विद्यार्थ्यांच्या समूहात विभाजित करून सहा ग्रुप तयार करण्यात आले. प्रत्येक समूहाला दोन प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे विभाजन करून देण्यात आले होते. त्याअंतर्गत रासेयो स्वयंसेवकांनी माधव नगर परिसरातील गॅस गोडाऊन, विनायक नगर, लाहोटी परिसर, एसएमसी शाळा परिसर व लाखाळा परिसरातील 50 किलो प्लास्टिक व कचरा गोळा केला व त्याचे योग्य ती विल्हेवाट लावली. रासेयो स्वयंसेवकांनी माधवनगर परिसरात घोषवाक्याच्या माध्यमातून "स्वच्छ भारत, सुंदर भारत" याचा संदेश दिला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील डॉ. संतोष धामणे, डॉ. संतोष इंगोले, डॉ. दत्तात्रय ढवारे, प्रा. सुनिता अवचार, प्रा. फुलचंद मोरे, प्रा. अभिजीत चंदेल, प्रा. विजय कवर, प्रा. अक्षय इंगळे, प्रा. साईप्रसाद देशमुख, प्रा. राठोड, प्रा. वाघ, प्रा. दर्शना सारडा, प्रा. दिया मोरे, प्रा. शुभम गोदारा यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
0 Response to "रासेयो स्वयंसेवकांद्वारे माधव नगर परिसरातील प्लास्टिक व कचरा निर्मूलन (जाधव महाविद्यालयाचे उपक्रम)"
Post a Comment