
संविधान दिनी 101 जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणार
साप्ताहिक सागर आदित्य
संविधान दिनी
101 जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणार
वाशिम, : जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिमेव्दारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने मोहिमेचे आयोजन करुन विविध उपक्रम राबविले जात आहे. या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ 101 जात वैधता प्रमाणापत्रांचे वाटप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथ सदस्य डॉ. छाया कुलाल, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मारोती वाठ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
0 Response to "संविधान दिनी 101 जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणार"
Post a Comment