जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली गिट्टी खदानची पाहणी, तलाठी साजा तपासणी व तहसील कार्यालयाला भेट
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली गिट्टी खदानची पाहणी, तलाठी साजा तपासणी व तहसील कार्यालयाला भेट
वाशिम दि.१९ - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १८ फेब्रुवारी रोजी रिसोड तालुक्यातील मौजा चिचांबापेन शिवारातील गिट्टीखदानची पाहणी केली.रिसोड येथील तलाठी साजा क्रमांक १ ला भेट देऊन दप्तर तपासणी केली व सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत रिसोड तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.यावेळी तहसीलदार अजित शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.
रिसोड शहरातील तलाठी साजा क्रमांक १ ची भेट देऊन दप्तर तपासणी केली.तलाठ्यांनी वेळेत ई - पीक पाहणी पूर्ण करणे,वेळेत सातबारा वाटप करणे, महसूल वसुली निर्धारित वेळेत पूर्ण करणे तसेच तलाठी साजाशी संबंधित असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करावी साजातून शेतकऱ्यांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेण्याची सूचना तलाठी धनंजय काष्टे यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
0 Response to "जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली गिट्टी खदानची पाहणी, तलाठी साजा तपासणी व तहसील कार्यालयाला भेट"
Post a Comment