सन्मती ज्ञान मंदिर येथे चि .अथर्व कडोळे या चिमुकल्याने वठवीली शिवरायाची भूमिका !
साप्ताहिक सागर आदित्य/
सन्मती ज्ञान मंदिर येथे चि .अथर्व कडोळे या चिमुकल्याने वठवीली शिवरायाची भूमिका !
कारंजा : शिवजयंतीला प्रत्येकांनी आपआपल्या घराघरात - मनामनात शिवजयंती साजरी केली शिवरायांचे राज्य हे साम्राज्य नसून रयतेचे राज्य होते . खऱ्या अर्थाने स्वराज्य होते . त्यामुळे सर्वधर्मिय बांधवासह निरनिराळ्या शैक्षणिक संस्थामध्ये सुद्धा शिवजयंतीचा आनंदसोहळा साजरा करण्यात आला. स्थानिक सन्मती ज्ञान मंदिर येथील चिमुकला चि . अथर्व कमलेश कडोळे या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याने साकारलेले शिवराय बघून शिक्षकवृंद व संस्थाचालकांनी त्याचे कौतुक केले . त्याची वेशभूषा, अदा आणि सवांदशैली बघून खुद्द सन्मती ज्ञान मंदिरच्या अध्यक्षा आणि अखिल भारतिय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा - सौ सुधाताई चवरे यांनी तसेच सौ गुंजनताई चवरे यांनी चि अथर्व कडोळेचे अभिनंदन केले .
0 Response to "सन्मती ज्ञान मंदिर येथे चि .अथर्व कडोळे या चिमुकल्याने वठवीली शिवरायाची भूमिका !"
Post a Comment