शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरामध्ये ९१ जणांचे रक्तदान राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप यांचा उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य/
शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरामध्ये ९१ जणांचे रक्तदान राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप यांचा उपक्रम
वाशीम - आपल्या जिल्ह्यात रक्ताचा भरपुर तुटवडा जाणवत आहे. याही तो कोनातून या दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ जयंतीचे औचित्य साधुन दि .१९ फेब्रुवारी २०२२ रोजी मौजे तोंडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप च्या माध्यमातुन महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करुन शिबीरास सुरवात झाली या शिबीरात तोंडगांव ,सायखेडा , वाशिम ,केकतउमरा,बाेराळा परिसरातील ९१ युवकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन करुन रक्तदान केले. त्यामध्ये प्रत्येक रक्तदात्यांना ग्रुप कडुन प्रमाणपत्र देण्यात आले.
या शिबीरास तोंडगांव मधील राजे संभाजी ब्लड डाेनर ग्रुप चे सर्व सदस्य , सर्व राजकीय नेते , सामाजिक कार्यकर्ते , युवा मंडळी ,सुप्रसिध्द बालराेग तञ डाँ कानडे, ग्रामीण पाेलीस स्टेशन चे ठाणेदार झळके,ग्रामपंचायत ताेंडगाव चे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले .या शिबीरात जिल्हा रक्तपेढीचे डाँ मुंडे सर,डाखाेरे मँडम,मिश्रा मँडम,अशिष इंगळे,सचिन दंडे,संदिप मोरे , लक्ष्मण काळे प्राथमिक आरोग्य केंद्र तोंडगांवचे कर्मचारी डाँ बल्लाळ, बावणे, राेशन नकवे , तसेच राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप च्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले .
सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा
स्थानिक वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये देखील भरपूर शिवभक्तानी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व मोरया ब्लड ग्रुप वर राजे संभाजी ग्रुप व सर्व मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिबिराला वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, शिक्षण मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक, राजू पाटील राजे, संतोष शिंदे, दौलतराव जी हिवराळे, महेश इंगळे, योगेश लमसूने, आकाश गायकवाड, प्रदीप पट्टेबहादूर राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक प्रशिक्षण संस्था केकतउमर व चाईल्ड लाईन टीम मेंबर आदी मान्यवर उपस्थित होते,
जयंतीनिमित्तला मोफत आरोग्य सेवेचा लाभ
स्पंदन हॉस्पिटल येथे शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टर ढवसे सर स्पंदन हॉस्पिटल येथे त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली तसेच यावेळी डॉ. ज्योती खडसे मॅडम स्त्री रोग तज्ञ ,डॉ. भांडेकर सर त्वचारोग तज्ञ व सौंदर्य चिकित्सक ,डॉ. रोग तज्ञ डॉ. सतीश पाटील सर, आधी डॉ. उपस्थिती होती.स्पंदन मेडिकल सरकारी, मेडिकल इथून मोफत औषधी वाटप करण्यात आली.श्री क्लीनिक या तपासणी मध्ये शुगर, बीपी मोफत तपासणी केली. यावेळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायतचे सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास गावंडे मंदार बालाजी गावंडे अहिरे पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरामध्ये ९१ जणांचे रक्तदान राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप यांचा उपक्रम"
Post a Comment