गाडगे बाबा जयंती निमित्त २३ फेब्रुवारी ते ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य/
संत गाडगेबाबा यांनी स्वच्छते बद्दल पेरलेल्या बीजाचे आजही या जगाला गरज - प्रदिप पट्टेबहादुर
गाडगे बाबा जयंती निमित्त २३ फेब्रुवारी ते ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी प्रदिप पट्टेबहादुर/
वाशिम - ग्राम केकत उमरा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती पट्टेबहादूर यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शासकीय निमशासकीय सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले नेहरू युवा मंडळ माध्यमातून व राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. आज २३ फेब्रुवारी केकतउमरा येथे स्वच्छतेचे पुजारी थोर समाजसुधारक गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला नेहरू या मंडळाचे अध्यक्ष व विद्यार्थी भारती संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष माजी राष्ट्रीय युवा कोरे भारत सरकार (ने.यू.के.) प्रदीप पट्टेबहादूर यांच्या उपस्थितीमध्ये गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त २३ फेब्रुवारी ते ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
यावेळी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. पट्टेबहादुर यावेळी बोलतांना म्हणाले की. गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे.
संत गाडगेबाबा यांनी स्वच्छते बद्दल जनजागृती केली त्या गावातील घाण साफ करून समाज कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले आजही या देशाला स्वच्छतेची गरज असून तिकडेच संत गाडगेबाबा यांनी त्याकाळी साकारलेल्या भूमिकेतून स्वच्छतेचे अत्यंत गरज आहे.अत्यंत गरज आहे यावेळी उपस्थित मनीषा पट्टेबहादूर, वैशाली पट्टेबहादूर, प्रशांत गायकवाड, रोहन पट्टेबहादुरहा सदर कार्यक्रमाला राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त प्रवीण पट्टेबहादुर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
0 Response to "गाडगे बाबा जयंती निमित्त २३ फेब्रुवारी ते ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन"
Post a Comment