-->

रक्तदान क्षेत्रात मोरया ब्लड डोनर ग्रुपचे कार्य उल्लेखनिय

रक्तदान क्षेत्रात मोरया ब्लड डोनर ग्रुपचे कार्य उल्लेखनिय


साप्ताहिक सागर आदित्य/

रक्तदान क्षेत्रात मोरया ब्लड डोनर ग्रुपचे कार्य उल्लेखनिय
शिवजयंतीनिमित्त ५१ शिवभक्तांचे रक्तदान

वाशिम - रक्तदान ही काळाची गरज असून या क्षेत्रात मोरया ब्लड डोनर ग्रुपने उल्लेखनिय कार्य करुन समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजीत रक्तदान शिबीराला शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल ५१ जणांनी रक्तदान करुन आपली सामाजीक जबाबदारी पार पाडली.
  शिबीराला शिक्षक आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, जि.प. सभापती तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष नामदेवराव हजारे, पिरीपा जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे यांच्यासह प्रतिष्ठीत मान्यवरांनी शिबीराला भेट देवून मोरया ग्रुपच्या पदाधिकार्‍यांचे कौतूक केले.
  रक्तदान व जनजागृती क्षेत्रात मोरया ग्रुप गेल्या २०१६ पासून जिल्हयात कार्यरत ग्रुपच्या वतीने शेकडो वेळा रक्तदान शिबीर आयोजित जिल्हा रक्तपेढीला असलेली रक्ताची गरज पुरविली होती. तसेच विविध प्रकारे रक्तदान जनजागृती करुन लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहीत करुन गरजेच्या वेळी विविध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा करण्यात मोरया ग्रुपने महत्वाची भूमिका पार पाडली होती.
  शिबीराच्या यशस्वीतेसाठी मोरया ग्रुपचे अध्यक्ष महेश धोंगडे, उपाध्यक्ष अक्षय हजारे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नामदेवराव हजारे, सचिव सागर गोरे, कोषाध्यक्ष नारायण काळबांडे, मार्गदर्शक योगेश लोणसुने, अजय तोडकर, स्वप्निल विटोकार, मनोज चौधरी,  शुभम शेळके, दिव्या देशमुख, महेश इंगळे, ऋषिकेश अंभोरे, सागर गोरे, नारायण काळबांडे, दीपक घोलप, भावना सरनाईक, नारायण व्यास, हुकूम तुर्के, अजय तोडकर, महेश इंगळे, रवी धोंगडे, नाना देशमुख, राम लांडगे, दिव्या देशमुख गोपाल इकडे, ऋषिकेश अंभोरे, शुभम शेळके, श्याम खोले, आकाश चव्हाण, निखिल देव, विकी गायकवाड, गणेश धोंगडे, अनिल धरणे, अक्षय धोंगडे, गजानन धोंगडे, विलास धोंगडे, दिनेश भिमटे, अविनाश राठोड यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

 

 


Related Posts

0 Response to "रक्तदान क्षेत्रात मोरया ब्लड डोनर ग्रुपचे कार्य उल्लेखनिय "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article