-->

'सीआरएम' चे पथक जिल्ह्यात दाखल

'सीआरएम' चे पथक जिल्ह्यात दाखल


साप्तहिक सागर आदित्य/

वाशिम - राष्ट्रीय आरोग्य अभियान ( एनएचएम ) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकारच्या १४ प्रतिनिधींचे ‘ सीआरएम'चे ( कॉमन रिव्ह्यू मिशन ) पथक ६ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात दाखल झाले . ११ नोव्हेंबरपर्यंत पथकाचा जिल्ह्यातच मुक्काम असून , आरोग्य विषयक लाभाच्या विविध योजनांसह पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेणार आहे . केंद्र शासनाने देशभरात २००५ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान ( एनएचएम ) सुरू केले . याअंतर्गत माता व बालमृत्यू दर कमी करणे , मलेरिया व डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविणे , सांसर्गिक व असांसर्गिक रोगांचा प्रसार थांबविणे , महिला व मुलांसाठी चांगल्या तथा दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणे , ग्रामीण भागातील मुलांच्या लसीकरणावर भर देणे , क्षयरोगाचे नियंत्रण यांसह इतरही विविध स्वरूपातील आरोग्यविषयक बाबींवर लक्ष केंद्रीत जात आहे . राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या कार्यक्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी ‘ सीआरएम'चे पथक जिल्ह्यात रविवारी दुपारी दाखल झाले . रविवारी सकाळी औरंगाबाद विमानतळावर वाशिमच्या वैद्यकीय चमूने सीआरएम पथकाचे स्वागत केले . राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची स्थिती व मुख्य ध्येयधोरणे , प्राधान्य क्षेत्रे यांचे जलद मुल्यांकन करणे तसेच आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून बलस्थाने व अडचणींचे विश्लेषण या चमूकडून केले जाणार आहे . नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच उत्कृष्ट कार्यपद्धतीच्या नोंदी घेतल्या जातील तसेच नवीन कार्यक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने मूल्यमापन , विविध भागीदारीतील प्रगती व समन्वय यंत्रणांचा आढावाही घेतला जाणार आहे . याबरोबरच जिल्ह्यातीलप्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र , ग्रामीण रुग्णालय , नागरी आरोग्य केंद्र यांसह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य विषयक सेवा नेमक्या कशा पद्धतीने पुरविल्या जातात , आरोग्य सुविधा कितपत उपलब्ध आहेत , केंद्र सरकारकडून मिळणारा निधी नियोजित सुविधांवर खर्च होतो किंवा नाही आणखी कोणत्या सुविधांची गरज आहे आदिंचा आढावा सोमवारपासून घेतला जाणार आहे .

Related Posts

0 Response to "'सीआरएम' चे पथक जिल्ह्यात दाखल"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article