
गवळी विद्यालयाचा आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर
साप्ताहिक सागर आदित्य
गवळी विद्यालयाचा आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर
अमानी:- नुकत्याच दि.१६ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा यशवंतराव चव्हाण हायस्कूल, मंगरूळपीर येथे पार पडल्या त्यामध्ये अमानी ता.मालेगाव येथील स्व. शंकरराव गणुजी गवळी विद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांचा आट्यापाट्या संघ हा विभागीय स्तरावर पात्र ठरला. या संघाला विद्यालयातील क्रीडाशिक्षक एन.डी.भिंगे यांनी मार्गदर्शन केले.
या संघामध्ये कृष्णा गवळी,ओम गवळी, संकेत गवळी, गोपाल गायकवाड, प्रतिक सरनाईक,साई देशमुख, प्रतीक नालटे, राजदिप खंडारे,राहुल पुरी,ओम मेटांगे,रोहित सरकटे,साई खंडारे इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.
विद्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा ज्ञानोपासक शिक्षण व स्वयंसेवी संस्था अमानी चे अध्यक्ष अनिल गवळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विभागीय स्तरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयातील व्हि.के. खिल्लारे, आर.बी. नव्हाळे,पी. एस.सरनाईक,वि.भि.गवळी, एस.एस.ठाकरे व डी.जी.तागड हे उपस्थित होते.यावेळी वर्ग आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "गवळी विद्यालयाचा आट्यापाट्या संघ विभागीय स्तरावर"
Post a Comment