
स्वच्छता ही सेवा पंधरवडा प्रभावी राबविण्याच्या सुचना
साप्ताहिक सागर आदित्य
कचरामुक्त भारतासाठी गावे कचरामुक्त करा: चंद्रकांत ठाकरे
स्वच्छता ही सेवा पंधरवडा प्रभावी राबविण्याच्या सुचना
'कचरामुक्त भारत' ही स्वच्छता हीच सेवा-२०२३ या मोहिमेचे ब्रिद आहे. कचरामुक्त भारतासाठी गावे कचरामुक्त करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे निर्देश जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. स्वच्छ भारत आणि जल जिवन मिशन अंतर्गत जि. प. च्या म. फुले सभागृहात (दि.18) सभा घेऊन त्यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाच्या सद्यस्थितीचा गावनिहाय आढावा घेतला.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष ठाकरे यांनी "स्वच्छता हीच सेवा" या पंधरवड्याच्या प्रभावी अमलबजावणीबाबत निर्देश दिले. गावपातळीवरील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने गावात स्वच्छबाबत विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्याचे फोटो प्रसारमाध्यमांबरोबर जिल्हास्तरावर पाठवण्याचे निर्देश गट विकास अधिकारी यांना दिले.
ज्या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे अजुनही सुरु झाले नाहीत त्या गावांची सुनावणी गट विकास अधिकारी यांनी घ्यावी आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.
सभेला सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे जिल्हा सल्लागार, बिआरसी- सिआरसी, उप अभियंता, शाखा अभियंता यांची ऊपस्थिती होती.
0 Response to "स्वच्छता ही सेवा पंधरवडा प्रभावी राबविण्याच्या सुचना"
Post a Comment