-->

मुलींच्या जन्माचे स्वागत करताना तिच्या भविष्याकडे लक्ष द्या              जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

मुलींच्या जन्माचे स्वागत करताना तिच्या भविष्याकडे लक्ष द्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.



साप्ताहिक सागर आदित्य 

मुलींच्या जन्माचे स्वागत करताना तिच्या भविष्याकडे लक्ष द्या

            जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. 


"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानाचा आढावा 

वाशिम  मुलगी जन्माला आल्यावर तिच्या जन्माचे स्वागत उत्साहात करताना, तिच्या नावाने वृक्षारोपण करावे.मुलगी ही दोन्ही घरची आधार आहे. तिला चांगले शिक्षण देऊन ती स्वबळावर उभी राहावी यासाठी तिच्या भविष्याकडे लक्ष द्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले 

      " बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानाचा आढावा 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित सभेत घेताना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) संजय जोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे,बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मीनाक्षी भस्मे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी सोनाली ठाकूर व प्रेमलता आसावा यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की,ज्या ग्रामपंचायतीमध्ये मुलींचा जन्मदर चांगला आहे,त्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात यावा.त्यामुळे इतर ग्रामपंचायतींना त्यांची प्रेरणा मिळेल.ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यात सोनोग्राफी सेंटर आहे,त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून त्या केंद्रात गर्भलिंग निदान होते का याची खात्री करावी.नोंदणी केल्यानंतर किती महिलांनी गर्भपात केला आहे, गर्भपात करण्या मागची कारणे कोणती आहे हे शोधावे. लग्न झालेल्या 18 वर्षाखालील किती मुलींची बाळंतपण झाले आहे, त्या स्तनदा माता आहेत का हे त्यांचे आधारकार्ड बघून तपासावे. जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमधून गर्भवती महिला व स्तनदा मातांची माहिती घेऊन कुण्या महिलेचा बालविवाह झाला असल्याचे काळजीपूर्वक बघण्याचे काम बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत त्यांनी सांगितले.

         जर बालविवाह झाला असेल तर त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत असल्याची खात्री करावी असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की,जिल्ह्यात बालविवाह झालेल्या माता किती आहेत याची माहिती द्यावी. शहरी भागातसुद्धा अशाच प्रकारची माहिती संकलित करावी. मुलींचे विवाह हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण होऊन त्या स्वबळावर उभे राहतील याच वयात आजच्या काळात झाले पाहिजे. मुलींसाठी अनेक योजना आहेत. त्या योजनांच्या लाभातून त्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो. मुलींसाठी जे विभाग योजना राबवितात. त्यांनी त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील मुली 12 वी नंतर शिक्षण घेत नाही. त्यांना पुढे व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांची कौशल्ये विकसित करून त्यांना स्वावलंबी करता येईल असे त्या म्हणाल्या.

      " बेटी बचाओ बेटी पढाओ " या अभियानाची व्यापक जनजागृती करण्यात यावी असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या की, शाळा व महाविद्यालयांमधून स्त्री जन्माचे महत्त्व पटवून द्यावे. जनजागृती कार्यक्रमात पुरुष मंडळींना देखील सहभागी करून घ्यावे. मुलींच्या जन्माचे स्वागत करताना त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्तींचा सत्कार करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.    

           जोल्हे यांनी प्रास्ताविकातून या अभियानाचा उद्देश लिंग निवडीस प्रतिबंध करणे,मुलींच्या शिक्षणाची तसेच तिच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे हा असल्याचे सांगितले.सन 2017- 18 या वर्षात मुलीच्या जन्माचे प्रमाण 953, सन 2018 -19 मध्ये 931, सन 2019-20 मध्ये 920, सन 2020 - 21 मध्ये 945, सन 2021- 22 मध्ये 916 तर एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 919 इतके होते. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या काळात 1 हजार  मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण मंगरूळपीर तालुक्यात 1015, रिसोड तालुका - 942, मालेगाव तालुका - 994, वाशिम तालुका - 909, कारंजा तालुका - 864 आणि मानोरा तालुका - 972 असे तर फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2023 हे सलग तीन महिने 1 हजारपेक्षा जास्त मुलींचे गुणोत्तर प्रमाण असलेल्या 164 ग्रामपंचायती जिल्ह्यात आहे.यामध्ये मंगरूळपीर - 30, रिसोड -9, मालेगाव - 40, वाशिम -32, कारंजा - 17 आणि मानोरा तालुक्यात 36 ग्रामपंचायती आहेत.एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत जिल्ह्यात सहा बाल विकास प्रकल्प 

कार्यालयातंर्गत असलेल्या गावात 5490 मुलींचा जन्म झाला.4879 वृक्षांची लागवड करून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आल्याची माहिती श्री.जोल्हे यांनी यावेळी दिली.    

              सभेला सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी,सर्व तालुका आरोग्य अधिकारी,जिल्हा अन्न व औषधी निरीक्षक,समाज कल्याण निरीक्षक,जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विधी अधिकारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "मुलींच्या जन्माचे स्वागत करताना तिच्या भविष्याकडे लक्ष द्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article