
आरटीओची फेसलेस सेवा सुरु
साप्ताहिक सागर आदित्य
आरटीओची फेसलेस सेवा सुरु
वाशिम, : परिवहन विभागामार्फत नागरीकांच्या सोयीसाठी सारथी व वाहन प्रणालीवर कामे करण्याच्यादृष्टीने व वेळेची बचत होण्याच्यासाठी फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अनुज्ञप्ती संबंधित सारथी प्रणालीमार्फत एकूण 13 सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आल्या आहे. संबंधितांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून सेवांचा लाभ घ्यावा. वाहनासंबंधित असलेली कामे सुरळीत व्हावीत यादृष्टीने वाहन प्रणालीमार्फत एकूण 7 सेवा व परवाना संबंधित 8 सेवा फेसलेस स्वरुपात सुरु करण्यात आल्या आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी वरील संकेतस्थळाचा वापर करावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.
0 Response to "आरटीओची फेसलेस सेवा सुरु"
Post a Comment