
एमसीईडीचे डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण
साप्ताहिक सागर आदित्य
एमसीईडीचे डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण
वाशिम, : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सर्वसाधारण योजना सन २०२३-२४ अंतर्गत सहशुल्क डिजीटल मार्केटिंगवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे.
या प्रशिक्षणात डिजीटल मार्केटिंगचे प्रशिक्षण, व्यक्तीमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी मार्गदर्शन, डिजीटल मार्केटिंग आधारीत उद्योगसंधी, डिजीटल मार्केटिंग व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगसंधी, डिजीटल मार्केटिंग प्लॉटफार्म/ टूल्स आदींविषयी थेअरी व प्रात्याक्षीक शिकविले जाणार आहे. प्रशिक्षण दोन आठवडयाचे आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. ४० प्रशिक्षणार्थीची निवड केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी हा किमान इयत्ता 10 वी पास किंवा पदवी/पदविका/आय.टी. आय. प्रमाणपत्र किंवा कौशल्यावर आधारित व्यावसायीक अभ्यासक्रम प्रमाणपत्रधारक असावा. प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 45 वर्ष असावे. तो जिल्हयाचा रहिवासी असावा.
प्रवेशासाठी www.mced.co.in या पोर्टलवर ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. शैक्षणिक कागदपत्रांसह शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे नावे असलेले बँकखाते पासबुकची सत्यप्रत व दोन फोटो इत्यादी कागदपत्रांसह कार्यक्रम आयोजक महेशसिंह पवार (8007991221), खुशाल रोकडे 7057968131 व पुरुषोत्तम ठोंबे 9822108023 यांच्याशी 05 जून 2023 पूर्वी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२५२- २३२८३८ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
0 Response to "एमसीईडीचे डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण"
Post a Comment