-->

पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया चे धरणे आंदोलन   जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर    आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकारांचा समावेश

पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया चे धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकारांचा समावेश


 

साप्ताहिक सागर आदित्य 

पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया चे धरणे आंदोलन

 जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकारांचा समावेश 

पत्रकारांशी  संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने ११ मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात 

आले. या पार्श्वभूमीवर शहरात  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आहे. यावेळी आंदोलक पत्रकारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

        या निवेदनातुन शासनास पत्रकारांच्या विविध मागण्या शासनास सादर करण्यात आल्या. यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती  देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी  विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड 

देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. त्यामुळे लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. अशा विविध मागण्या घेवून या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्या गेला. जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात जेष्ठ पत्रकार नंदकिशोर शिंदे, गजानन वाघ, शिखरचंद बांगरेचा, संघटनेचे विदर्भ कार्यवाह धनंजय कपाले, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष राम धनगर, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा सचिव रमेश उंडाळ, उपाध्यक्ष आकाश पाटील शिंदे, अर्जुन खरात, विनोद बोडखे, दिलीप अवगण , प्रल्हाद पाटील  पौळकर, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर, अजय चौथमल, सचिन साठे, मोहम्मद सलीम, पांडुरंग रेकडे, दिपक मापारी, श्रीकृष्ण खिल्लारे, आत्माराम जाधव, विकेश डोंगरे, वैभव पायघन, किरण पडघान, वसंत खडसे, निलेश सोमाणी, बाळासाहेब देशमुख, सुनील बांगर, संदीप डोंगरे, सुनिल कांबळे, महादेव घुगे, कैलास बनसोड, प्रदीप सावळे , विनोद तायडे, फिरोज शहा, संदीप भातुडकर आदिंसह व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध संघटनेच्या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, माजी आ़ अ‍ॅड़ विजयराव जाधव व शेतकरी नेते दामुअण्णा इंगोले यांनी पत्रकारांच्या आंदोलनाला भेट देवून पाठिंबा दर्शविला. यानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.



Related Posts

0 Response to "पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडिया चे धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकारांचा समावेश"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article