-->

दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने  वाटपासाठी तपासणी शिबीर  17 मे - देगांव आणि 18 मे - मालेगांव

दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर 17 मे - देगांव आणि 18 मे - मालेगांव

 


साप्ताहिक सागर आदित्य 

दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने

वाटपासाठी तपासणी शिबीर

17 मे - देगांव आणि 18 मे - मालेगांव

        वाशिम,  : दिव्यांग सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय विभाग व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वितरण करण्यासाठी रिसोड तालुक्यातील आयुर्वेदिक महाविद्यालय, देगांव येथे  17 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत दिव्यांग व्यक्तींना लागणाऱ्या कृत्रिम अवयव साहित्यासाठी तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबीराचे शिबीर प्रमुख म्हणून रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यु.डी. राजपुत (9421326078) हे असतील.


            मालेगांव येथील ना.ना. मुंदडा हायस्कुल येथे दिव्यांग व्यक्तींच्या तपासणी शिबीराचे आयोजन 18 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत केले जाणार आहे. या शिबीराचे शिबीर प्रमुख म्हणून मालेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.एस. काळपांडे (9011651428) हे असतील. या तपासणी शिबीरात दिव्यांग लाभार्थ्यांनी 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, 22,500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स प्रत व पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सोबत आणावे. जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.  



Related Posts

0 Response to "दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर 17 मे - देगांव आणि 18 मे - मालेगांव"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article