
विविध ठिकाणी जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
विविध ठिकाणी जागतिक युवा
कौशल्य दिन उत्साहात साजरा
वाशिम, : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम आणि स्टेट बँक ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमांत प्रशिक्षण संस्थेतील फोटाग्राफी ॲण्ड व्हिडीओग्राफी या अभ्यासक्रमांतर्गतच्या प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिमच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम, सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम,स्वामी विवेकानंद व्होकेशनल इंस्टिटयूट, रिसोड जि. वाशिम येथेसुद्धा कार्यालयाच्या संयुक्त वतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेबिनारद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम, सौ. सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम येथील जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमांच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व इतर उमेदवारांनी स्पर्धेमध्ये मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. दोन्ही महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांर्तगतच्या कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत दिपक भोळसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथील कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थीनीपैकी प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र नेहा डोंगरदिवे हिला देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक किरण भालेराव हीला देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक धिरज झिंगरे याला देऊन गौरविण्यात आले.
महाविद्यालयातील कार्यक्रमास प्राचार्य विनायक दुधे यांनी अध्यक्षस्थान भुषविले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. गजानन वाघ यांनी मानले. सौ. सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका सरकटे, द्वितीय क्रमांक कुणाल जाधव आणि तृतीय क्रमांक संतोष जाधव यांनी पटकाविला.प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत जोशी हे कार्यक्रमास अध्यक्षस्थानी होते, शिक्षक गणेश भरडे यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार मानले. दोन्ही ठिकाणच्या जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाच्या सहायक आयुक्त, श्रीमती सुनंदा बजाज यांच्या मार्गदर्शनात संजय राऊत, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्रीमती खिरोडकर तसेच संजय उगले, प्रतिक बाराहाते, अतिष घुगे, अमोल मरेवाड यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "विविध ठिकाणी जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा"
Post a Comment