-->

जिल्हा रुग्णालयात मासिक पाळी स्वच्छता दिवस  उत्साहात संपन्न

जिल्हा रुग्णालयात मासिक पाळी स्वच्छता दिवस उत्साहात संपन्न


 

साप्ताहिक सागर आदित्य 

आत्मविश्वासाने 'त्या' दिवसांचा सामना करा 

     जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे


जिल्हा रुग्णालयात मासिक पाळी स्वच्छता दिवस  उत्साहात संपन्न


वाशिम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम येथे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल कावरखे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ.पराग राठोड बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.सोनल वायाळ सास्ते हे होते.तर प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अविनाश पुरी,बालरोगतज्ञ डाॅ.गोरे,प्राचार्य डाॅ. माधुरी पेटकर,विधी समुपदेशक अॅड.राधा नरवलीया,आरोग्य परिचारिका रुपाली शिंदे,मानसोपचार तज्ञ डाॅ.मंगेश भाग्यवंत,अधिसेविका रेणुकादास मैड,आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन किशोरवयीन आरोग्य समुपदेशक दिपक भालेराव यांनी केले.उपस्थित किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अनिल कावरखे म्हणाले,सर्वप्रथम २८ मे २०१४ साली 'वाॅश युनायटेड आँफ जर्मनी या संस्थेने मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यास सुरवात केली.हा दिवस दरवर्षी २८ मे रोजी साजरा केला जातो.वास्तविक हा दिवस निवडण्यामागेही एक कारण आहे ते म्हणजे सरासरी स्ञीचं मासिक पाळीच चक्र हे २८ दिवसांच असतं आणि दरमहा सरासरी ५ दिवस पाळी येत असते.म्हणून २८ मे हाच दिवस मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतात.यावर्षीचे घोषवाक्य "Together For a Period Friendly World" हे आहे.महिलांच्या आरोग्यासाठी,शिक्षणासाठी आणि सन्मानासाठी मासिक पाळी स्वच्छता महत्वाची आहे.मासिक पाळीच्या आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनाच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा करावयाचा आहे. असे आवाहन डाॅ.अनिल कावरखे यांनी उपस्थितांना केले . मासिक पाळी समज गैरसमज या संदर्भात डाॅ.पराग राठोड व स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.सोनल वायाळ सास्ते यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तथा शासकीय परिचर्या विद्यालयातील विद्यार्थी,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार किशोरवयीन आरोग्य समुपदेशक दिपक भालेराव यांनी मानले.

0 Response to "जिल्हा रुग्णालयात मासिक पाळी स्वच्छता दिवस उत्साहात संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article