
जिल्हा परिषद शाळा पटसंख्या वाढीसाठी उपाययोजना करा यांचे प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद शाळा पटसंख्या वाढीसाठी उपाययोजना करा यांचे प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन
सरकारी शाळेचा खालावलेला दर्जा आणि दिवसेंदिवस कमी होणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या ही आपल्यासाठी नवीन बाब नाही, जागतिक काळाच्या स्पर्धेच्या शर्यतीत विद्यार्थ्यांनी पुढे राहावे असे वाटणे प्रत्येक पालकांना साहजिकच आहे, त्यामुळे चांगल्या दर्जाच्या खाजगी शाळांमध्ये व महाविद्यांलयामध्ये पालक आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी धडपड करीत असतो,
सरकारी शाळेचा जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळा दर्जा उत्तम असतानाही पालक सरकारी शाळेकडे पाठ फिरवीत आहेत, सदर गोष्टीकडे आपण गांभीर्याने लक्ष न दिल्यास कालांतराने सरकारी शाळा नामशेष होतील, यावर उपाययोजना म्हणून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष प्राधान्य मिळाल्यास सरकारी शाळेमध्ये प्रवेश व शिक्षण घेण्यास जनतेचा कल वाढेल व सरकारी शाळांना नवचेतना मिळेल.
सदर गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यामुळे सरकारी शाळेचा दर्जा व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल विविध मागण्या सह प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी निवेदन दिले आहे,,
0 Response to "जिल्हा परिषद शाळा पटसंख्या वाढीसाठी उपाययोजना करा यांचे प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन"
Post a Comment