
वंचीत बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-मोर्चाला बहूसंख्येने उपस्थित राहा.. डॉ. सिद्धार्थ देवळे यांचे आवाहन....
साप्ताहिक सागर आदित्य
वंचीत बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-मोर्चाला बहूसंख्येने उपस्थित राहा..
डॉ. सिद्धार्थ देवळे यांचे आवाहन....
वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनाच्या धर्तीवर दि.२० जुलै २०२३ रोजी मुंबई मंत्रालयावर गायरान धारकांचा भव्य राज्य व्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यामध्ये प्रमुख्य मागण्या खालील प्रमाणे आहेत,
• शासकिय गायरान जमिनी / महसूल जमिनी
अतिक्रमण धारकांच्या नावे नियमानूकुल करणे.
● गायरान धारक भूमिहीनांच्या शेतीचा सातबारा मिळणे •
• बेघर, अनुसुचित जाती-जमाती आदीवासी भटके भूमिहीनांना घरकुल योजनेचा लाभ देऊन सरसकट मातलाग मालकी हक्काचा करणे.
अश्या विविध मागण्यासाठी या राज्य व्यापी महा-मोर्चात विदर्भातील तमाम गायरान धारकांनी व वंचीत बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आप-आपल्या कार्य परिसरातील गायरान धारका समवेत मुंबई येथे बहूसंख्येने विदर्भातून उपस्थित राहुन बहुजनांच्या अन्याय हक्का साठी अहोरात्र लढणाऱ्या एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहावे असे आवाहन वंचीत बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा हृदय रोग तज्ञ डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Response to "वंचीत बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-मोर्चाला बहूसंख्येने उपस्थित राहा.. डॉ. सिद्धार्थ देवळे यांचे आवाहन...."
Post a Comment