-->

वाशिम येथे जागृक पालक सुदृढ बालक  मोहिमेचा शुभारंभ

वाशिम येथे जागृक पालक सुदृढ बालक मोहिमेचा शुभारंभ

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वाशिम येथे जागृक पालक सुदृढ बालक

मोहिमेचा शुभारंभ

       वाशिम, : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी  विभागातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची व किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याकरिता राबविण्यात  येणाऱ्या जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानाचा शुभारंभ आज ९ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील एसएमसी इंग्लिश स्कुलमध्ये करण्यात आला. या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत हया होत्या. उदघाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती चक्रधर गोटे यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.)  राजेश शिंदे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, पंचायत समितीचे उप सभापती गजानन गोटे, इंग्लिश स्कुलच्या प्रा. मिना उबगडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मोबीन खान, यांची प्रमुख उपस्थिती होती.


           प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ.कोरे यांनी अभियानातून प्रास्ताविकातून महत्व विषद केले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष  गोटे यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी शाळेमध्ये उपस्थित 1 ते 18 वयोगटातील 1500 बालकांची आरोग्य तपासणी 14 समुदाय आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या चमूने केली. तसेच पालकांचे व बालकांचे समुपदेशन करण्यात येऊन आवश्यकतेनुसार संदर्भसेवा देण्यात आल्या.  कार्यक्रमाचे संचालन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.   



Related Posts

0 Response to "वाशिम येथे जागृक पालक सुदृढ बालक मोहिमेचा शुभारंभ"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article