-->

13 फेब्रुवारी रोजी  रोजगार मेळावा

13 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

13 फेब्रुवारी रोजी

रोजगार मेळावा

       वाशिम,  : जिल्हयातील नामांकित नियोक्त्यांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाकडून पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 13 फेब्रुवारी रोजी औद्येगिक प्रशिक्षण संस्था, वाशिम येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात परम स्किल्स ट्रेनिंग इंडिया प्रा.लि.,औरंगाबाद, पिपल ट्री व्हेंचर्स प्रा.लि.अमरावती, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, अमरावती.ड्रीम प्लास्ट,चाकण, पुणे, महाले आनंद लि. चाकण, पुणे, दाना आनंद लि. चाकण, पुणे, मार्स कंपनी, खेड सिटी, प्रिकॉल इंडिया लि. वाघोली, पुणे, हॅल्डेक्स इंडिया लि. नाशिक, शारदा मोटर्स लि. एमआयडीसी, सिन्नर, नाशिक, एन्डयुरन्स टेक्नॉलॉजी लि./ रुची इंजिनियर्स प्रा.लि. वाळूज व अजय पॉली प्रा.लि. शिरपूर एमआयडीसी, औरंगाबाद येथील नामांकित आस्थापना/ कंपन्यांमध्ये 100 रिक्त जागेवर रोजगार मिळविण्यची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याव्दारे प्राप्त होणार आहे.


          जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. या रोजगार मेळाव्यात इ. 10 वी, 12, स्थापत्य पदविका/कृषि पदविका/आयटीआय सर्व ट्रेड/इतर सर्वशाखीय पदवीधर असणा-या रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांना त्याच्याकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. यानुसार सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडून ऑफलाईन वा ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे.  


          या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रीया पध्दत पुढीलप्रमाणे आहे. www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Forth Comming Pandit Dindayal Upadhyay Job Fairs या खाली View All वर क्लिक करून Washim जिल्हा सिलेक्ट करून सर्च करावे.नंतर रोजगार मेळावा दिसेल. त्यासमोरील View More वर क्लिक करुन View Vacancies क्लिक करावे.त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामधील रिक्त पदे दिसतील


त्या समोर APPLY करावे. त्यानंतर (Please login or register to apply the Jobfair vacancies other than


Aurangabad District Jabfair, Please close the nest Pop up and then Login or Register) असा मँसेज दिसेल OK करून आपल्याकडील www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करावा. या पध्दतीने ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येईल. काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या दूरध्वनी क्र. ०७2५२-२३१४९४ व भ्रमणध्वनी क्रमांक ९८५०९८३३५/८६६८२५६५००/ ७८७५७98६८४ यावर संपर्क साधावा.



Related Posts

0 Response to "13 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article