
रामेश्वर भाऊ यांची मुलगी साक्षी ही खरी सावित्रीची लेक ठरली
साप्ताहिक सागर आदित्य
कौतुक सावित्रीच्या लढवय्या लेकिचं
मित्रांनो आपल्या शिक्षक सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी रामेश्वर बोरकर यांच काही दिवसांपूर्वी अकाली निधन झालं.
ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्याच दिवशी त्यांच्या मुलिचा "साक्षी" चा पहिला पेपर होता ..
घरात वडिलांचं निधन झाले
आणी तिकडे पहिला पेपर .. एखाद्या मुलीने वडिलांचे निधन झाले म्हणून पेपर देणे टाळले असते. पण रामेश्वर भाऊ यांची मुलगी साक्षी ही खरी सावित्रीची लेक ठरली ..जिने अपार दुःखाचा डोंगर कोसळलेला असतांनाही पेपर देण्याचा निर्णय घेतला..
पेपर देऊन आल्यावर वडीलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिने वडिलांच छत्र हरविलेले असतांनाही बाराविचे सर्व पेपर दिले .
तिने बारावी विज्ञान विषयात 90%गुण मिळवून प्राविण्य मिळवले आहे.तिच्या या जिद्दिला मानाचा मुजरा..
अशाच सावित्री च्या लेकिंची आज भारताला गरज आहे...
आज तिने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाची कुठंतरी आपण दखल घेऊन तिचा यथोचीत सन्मान करावा या उद्देशाने आज तिची भेट घेतली .तिचे पुढील भविष्यासाठी असलेले ध्येय जाणून घेतले व तिचा छोटेखानी सत्कार केला ...
तिच्या विषयी लिहायला शब्द अपुरे पडतील एवढी ती साक्षी गुणी आहे....
तिच्या या सन्मान समारंभासाठी
राष्ट्रवादी शिक्षक संघ वाशिम चे राज्य प्रतिनिधी सुरेशदादा नरवाडे , डि.एन.बिल्लारी,गजाननराव मानवतकर, कैलासराव मानवतकर,भागवत साबळे,हटवार सर ,अमोल बोडखे, राष्ट्रवादी चे रिसोड तालूकाध्यक्ष शिवशंकर नरवाडे
तसेच शिक्षक मित्र परिवार रिसोड चे
प्रमोद गरकळ,प्रशांत देशमुख, ज्ञानेश्वर कहाकर उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक संघ वाशिम चे नेते विलासराव गोटे यांनी भविष्यात साक्षी ला कुठलीही मदत लागल्यास राष्ट्रवादी शिक्षक संघ वाशिम सदैव मदतीस पुढे असेल हा शब्द दिला.
0 Response to "रामेश्वर भाऊ यांची मुलगी साक्षी ही खरी सावित्रीची लेक ठरली"
Post a Comment