-->

शिवजन्मोत्सवानिमित्त  जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान सप्ताह  जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे  जिल्हा शल्य चिकीत्सकाचे आवाहन

शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान सप्ताह जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे जिल्हा शल्य चिकीत्सकाचे आवाहन

 


शिवजन्मोत्सवानिमित्त

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान सप्ताह

जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे

जिल्हा शल्य चिकीत्सकाचे आवाहन

       वाशिम,  : शासकीय रक्तकेंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे शिवजन्मोत्सवा निमित्त वाढती रक्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत रक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. जिल्हयात रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय रक्त केंद्रामार्फत दररोज अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. जिल्हयात जवळपास ८० ते १०० सिकलसेल व थालासेमियाग्रस्त मुले आहेत. त्यांना प्रत्येक १५ ते २० दिवसाला रक्त पिशवीची गरज भासते. जिल्हा स्त्री रुग्णालय सुरू झाल्यामुळे जिल्हयातील गरोधर माता, प्रसूत माता यांना देखील रक्तपिशवीची आवश्यकता भासते. त्यामुळे शासकीय रक्तकेंद्रात रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी शासकीय रक्त केंद्रातर्फे १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हयातील वेगवेगळ्या ठिकाणी पुढीलप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

          18 फेब्रुवारी रोजी रिसोड येथील स्व. पुष्पादेवी पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय, 19 फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन, लाखाळा व वाशिम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तोंडगांव, 20 फेब्रुवारी रोजी हनुमान संस्थान, नंधाणा, ता. रिसोड, 21 फेब्रुवारी रोजी मारोती मंदिर, बस स्टँड, मोहरी, ता. मंगरुळपीर, 22 फेब्रुवारी रोजी विठ्ठल रुखमिनी संस्थान, काजळेश्वर, ता. कारंजा, 23 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा, माहुली, ता. मानोरा व 24 फेब्रुवारी रोजी महालक्ष्मी पेट्रोल पंपजवळ, वाशिम येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

          छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन जिल्हयातील तरुण यूवकांनी रक्तदानासारख्या सामाजिक कार्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. वाढती रक्ताच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी शासकीय रक्तकेंद्र, सामान्य रुग्णालय येथे रक्तदान करावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे यांनी केले आहे.



Related Posts

0 Response to "शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान सप्ताह जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे जिल्हा शल्य चिकीत्सकाचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article