
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणारी योजना आहे - प्रशांत कावरे ( ना. तहसिलदार )
साप्ताहिक सागर आदित्य
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणारी योजना आहे - प्रशांत कावरे ना. तहसिलदार
वाशिम :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे अशा मताचे प्रतिपादन मा. प्रशांत कावरे ( नायब तहसीलदार, महसूल, वाशिम) यांनी केले.
ग्राम आसोला ( जहाँ. ) येथे श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने दिनांक 10/02/2023 ते
17/02/2023 दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रशांत कावरे ( नायब तहसीलदार, महसूल, वाशिम) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव जमधाडे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नारायण शिंदे ( ग्रामसेवक ) , सौ. शारदा इंगोले ( सरपंच ) , माधव महाले , शेषराव इंगोले , प्रा.डॉ.एस.एन.शिंदे , राहुल कोठारी ( संचालक , श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, वाशिम ) , वैभव बरडे, सेवाराम बरडे , गजाननराव खडसे , अलियार खान पठाण यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज राठोड यांनी केले तर जितेश कांबळे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.अशोक वाघ , रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.सचिन इंगोले , रा.से.यो. महिला कार्यक्रम अधिकारी सहा.प्रा.डॉ.शितल उजाडे यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणारी योजना आहे - प्रशांत कावरे ( ना. तहसिलदार )"
Post a Comment