
रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला प्रारंभ शेंकडों तरुणांनी केले रक्तदान
साप्ताहिक सागर आदित्य
रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला प्रारंभ
शेंकडों तरुणांनी केले रक्तदान
मालेगाव : तालुक्यातील सोमठाणा येथे जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवा निमित्ताने आयोजित भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोमठाणा ग्रामस्थ तसेच मावळा ब्लड डोनर ग्रुप यांच्या पुढाकारातून जिजाऊ-सावित्री दशरात्रोत्सवाच्या औचित्यावर दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते़ त्यानुसार यंदाही ३ जानेवारी रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरूवात ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक संतोष शितलकर, रवि कुटे, किर्ती रेडगे, सामाजिक कार्यकर्ते भागवत मापारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरात प्रख्यात डॉक्टरांकडून रक्तदाब, मधूमेह, हृदयरोग, निमोनिया, पोटविकार, छातीरोग, किडनी रोग, मेंदू रोग, अर्धांगवायू, विषबाधा, टायफाईड, सर्पदंश,डेंग्यू, टिबी, तापाचे आजार आदि आजारांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. सोबतच रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू उपस्थित राहून शेंकडों तरुणांनी रक्तदान केले. तर आरोग्य शिबिरासाठी डॉ. असलम शफी शेख व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मावळा डोनर ग्रुप व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमा दरम्यान इंजिनिअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव अमोल पाटील गायकवाड यांनी भेट दिली. रक्तदान शिबीरामध्ये डॉ. मुंडे, संदिप मोरे, सचिन दंडे, आशिष इंगळे, लक्ष्मण काळे तर आरोग्य शिबिराला डॉ. असलम शफी शेख ,शेख रिहान, शेख सोहेल, दिलीप पातळे, आकाश खंडारे, रितु डाखोरे आदिंनी सहकार्य केले.
0 Response to "रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला प्रारंभ शेंकडों तरुणांनी केले रक्तदान "
Post a Comment