
स्वच्छ ग्राम सुंदर भारत-महादेवराव देवळे
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छ ग्राम सुंदर भारत-महादेवराव देवळे
परिसरातील दी आर्य शिक्षण संस्था द्वारा संचालित सनराइज इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज मालेगाव द्वारे ग्राम नागरदास येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नागरदास ग्रामपंचायतचे सरपंच महादेवरावजी देवळे व प्रमुख अतिथी सुधाकर देवळे सुखदेवराव देवळे पांडुरंग दुबे जगन गाडे हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरपंच देवळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व विशद करून सांगितले व तसेच आजारांना दूर ठेवण्याकरता प्रत्येकानेच आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची आवाहन केले,
या कार्यक्रमाकरिता मुख्य प्रशासक पंकज नवघरे, इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या रोज मेरी जॉन आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सदानंद सुर्वे , प्रा. सिद्धार्थ भालेराव प्रा. बालाजी गवळी शुभम शिंदे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते, विद्यार्थ्यांनी सर्व परिसर स्वच्छ केला, कार्यक्रमाचे संचालन प्रा. सिद्धार्थ भालेराव सर व आभार प्रदर्शन प्रा.बालाजी गवळी सर यांनी केले.
0 Response to "स्वच्छ ग्राम सुंदर भारत-महादेवराव देवळे "
Post a Comment