
डॉ. पदमानंद तायडे यांची प्रोफेसर पदी नियुक्ती
साप्ताहिक सागर आदित्य
डॉ. पदमानंद तायडे यांची प्रोफेसर पदी नियुक्ती.
स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, वाशिम येथे प्र.प्राचार्य व समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा.डॉ. पदमानंद मनोहर तायडे यांची नुकतीच प्रोफेसर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व प्रथम समाजशास्त्र विषयात प्रोफेसर म्हणून नियुक्तीचा बहुमान डॉ. पदमानंद तायडे यांना मिळाला आहे.संत गाडगेबाबा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकांना त्यांच्या संशोधन कार्याच्या व कर्तुत्वाच्या आधारावर विविध पदांवर पदोन्नती व नियुक्ती देण्यात येत असते. याच आधारावर डॉ. तायडे यांना प्रोफेसर पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
डॉ. तायडे हे 2005 पासून श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय येथे समाजशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सतरा वर्षाच्या सेवेमध्ये विविध पदावर कार्य केले आहे. तसेच ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत असतात. यांनी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक म्हणून चार वर्षे कार्य केले आहे, तसेच विद्यापीठाच्या कौशल्य विकास उपक्रमाचे ते प्रशिक्षक म्हणून वाशिम जिल्ह्यात काम पाहतात. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 34 संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. व दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ही नियुक्ती देण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती समितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग अमरावती विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू प्रतिनिधी डॉ. किशोर राऊत विषय तज्ञ डॉ बि.एच.कीर्दक, डॉ. अनिल वानखडे हे उपस्थित होते. विद्यापिठात कमी वयात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी तज्ञ समितीने त्यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या नियुक्ती करिता संस्थेचे अध्यक्ष ॲड विजयराव जाधव सचिव रंगनाथजी पांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ. संतोष धामने,डॉ. संतोष इंगोले, डॉ. डि.एम.ढवारे, डॉ. विजय जाधव श्री पाचरणे आदी उपस्थित होते.
0 Response to "डॉ. पदमानंद तायडे यांची प्रोफेसर पदी नियुक्ती"
Post a Comment