
भारत प्राथमिक शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा
रिसोड :येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली .याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरणताई दुबे यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक पंजाबराव देशमुख, शिक्षिका ज्योती दुबे, शिवकन्या गोरटे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की,' क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांनी सामाजिक बहिष्कार स्वीकारून केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य ऐतिहासिक व प्रेरणादायी आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा' असे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका व गीत सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष गोडघासे यांनी केले तर गजानन डोंगरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Response to "भारत प्राथमिक शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा"
Post a Comment