
दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविले
साप्ताहिक सागर आदित्य
दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व
इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविले
वाशिम, : राष्ट्रीय विश्वस्थ अधिनियम १९९९ नुसार आत्ममग्न प्रमस्तिष्क पक्षाघात, मतिमंद व बहुअक्षमताधारक वय १८ वर्षावरील अक्षम व्यक्तींकरीता कायदेशीर पालकत्व प्रदान करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील स्थानिकस्तर समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व धारण करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,वाशिम येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.
0 Response to "दिव्यांग व्यक्तींचे कायदेशीर पालकत्व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविले"
Post a Comment