
वाशिम जिल्ह्यात अमृत संस्थेचे नवे पाऊल विकासाच्या दिशेने आशावादी वाटचाल
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात अमृत संस्थेचे नवे पाऊल विकासाच्या दिशेने आशावादी वाटचाल
राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने म्हणजे "महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी - अमृत" या संस्थेच्या वाशिम येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन दि.१६ जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनी फीत कापून कार्यालयाचे लोकार्पण केले.
उद्घाटनप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा तसेच अमृतचे विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांनी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या सहकार्याने वाशिम जिल्ह्यातील "अमृत" संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सहाय्यक जिल्हाधिकारी . वर्मा यांनी जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांना आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
"ही केवळ सुरुवात आहे – संशोधनातून विकासाच्या दिशेने" असे आश्वासक उद्गार विशेष कार्य अधिकारी . वरणगावकर यांनी काढले. त्यांनी ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्याचे स्वप्न अमृत संस्थेच्या नव्या कार्यालयातून साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला जिल्हा उप-व्यवस्थापक रोहीत देशमुख, अमृत मित्र नंदकिशोर वनस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प रोहित देशमुख यांनी केले तर . आरु आणि . वनस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
हे कार्यालय वाशीमकरांसाठी एक प्रेरणादायी केंद्रबिंदू ठरेल.या उद्घाटन सोहळ्याने जिल्ह्यातील संशोधन आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
0 Response to " वाशिम जिल्ह्यात अमृत संस्थेचे नवे पाऊल विकासाच्या दिशेने आशावादी वाटचाल"
Post a Comment