
ग्राहकहितासाठी ठोस पावले ! वाशिममध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
ग्राहकहितासाठी ठोस पावले ! वाशिममध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक संपन्न
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची पहिली मासिक सभा पार पडली. या बैठकीस शासकीय सदस्य जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी.एस.ठोंबरे, जिल्हा माहिती अधिकारी यासिरोद्दिन काझी,प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे अधिकारी,पोलिस उपनिरीक्षक आर.व्ही. भोंडवे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चेतन बावणे, सहाय्यक पुरवठा अधिकारी भारती सोनटक्के आणि अशासकीय सदस्य गजानन साळी, अभय खेडकर, जुगलकिशोर कोठारी ,प्राचार्य डॉ. कमल किशोर अग्रवाल, प्रदीप टाकळकर ,प्रवीण वानखडे, नामदेव बोरचाटे, संगीता इंगोले, कविता खराट वृषाली टेकळे चंद्रशेखर राठी सुनील महाजन, प्रमोद लकरस यांच्यासह ग्राहक संरक्षण क्षेत्राशी संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब दराडे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यांनी ग्राहक आयोगाची जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्यपद्धती, तसेच प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी असलेली प्रक्रिया यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी यापुढे दर महिन्याला नियमितपणे परिषदेस बैठक घेण्याचे आदेश दिले आणि ग्राहकांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे निर्देश दिले. ग्राहकांवर अन्याय होऊ नये यासाठी परिषद सक्रियपणे काम करेल असे त्यांनी नमूद केले.
बैठकीत ग्राहक जनजागृती मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत आणि बाजारपेठांमध्ये जनजागृतीपर उपक्रम घेतले जातील. ग्राहकांना त्यांच्या हक्क व कर्तव्यांबाबत माहिती देणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट राहील.
ग्राहक संरक्षण परिषदेविषयी थोडक्यात माहिती:
ग्राहक संरक्षण परिषद ही न्याय मंत्रालयाच्या अधिपत्याखालील एक स्वायत्त संस्था असून ती ग्राहकांच्या हितासाठी कार्य करते. ग्राहक पंचायत समित्या ही या कार्यपद्धतीचा एक भाग असून त्या स्थानिक पातळीवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी सजग असतात.
या परिषदेचा उद्देश ग्राहकांना योग्य माहिती, सुरक्षित सेवा, वस्तूंची गुणवत्ता, निवडीचा अधिकार आणि तक्रार निवारणाची सुविधा पुरवणे हा आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, पुरवठा विभाग आणि स्थानिक संस्थांमार्फत या परिषदेच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते.
0 Response to "ग्राहकहितासाठी ठोस पावले ! वाशिममध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक संपन्न"
Post a Comment