
भारत प्राथमिक शाळेत शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक शाळेत शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न
रिसोड: येथील भारत प्राथमिक शाळेत 12 जुलै रोजी शिक्षक-पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून कैलास अलोने, गजानन साखरे, सुरेश गोरेकर, दीक्षा सोनवणे , नुसरत खानम व प्रतिमा जुमडे मंचावर उपस्थित होते. विद्येची देवता माता सरस्वती तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने सभेस सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढी संदर्भात समस्या सोडवण्यासाठी व पालक शिक्षक समन्वय घडवून आणण्यासाठी पालक शिक्षक संघ, माता पालक संघाची स्थापना याप्रसंगी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका किरणताई दुबे यांनी शाळेच्या अध्यक्षा जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली." विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व शिक्षण प्रक्रिया अधिक सुदृढ होण्यासाठी पालक व शिक्षक यांचा सहविचार संवाद होणे आवश्यक असते, कारण विद्यार्थी व पालक या दोघामध्ये शिक्षक एक संवेदनशील भूमिका पार पाडत असतो."असे मुख्याध्यापिका किरणताई दुबे पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या.
यांनतर पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेले विद्यार्थी आस्था डिडवाणी ,अंश रासकर, रितेश बशीरे, समर्थ पायघन व प्रतीक अलोने आदी विद्यर्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर सभेमध्ये विविध विषय मांडण्यात आले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थिती, स्वच्छता, शारीरिक व बौद्धिक विकास कसा साधता येईल, या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पालक प्रतिनिधी केशव गरकळ, प्रतिमा जुमडे यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनंजय वाघ यांनी केले तर अमोल मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Response to " भारत प्राथमिक शाळेत शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न "
Post a Comment