
गुरु म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा अमूल्य स्त्रोत- प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम .
साप्ताहिक सागर आदित्य
गुरु म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा अमूल्य स्त्रोत- प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम .
(स्थानिक रिसोड )- भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे गुरुपौर्णिमा मोठ्या हर्षउल्लासात साजरी करत असताना प्रथमतः प्राचार्या सन्माननीय मंजुषा सु. देशमुख मॅडम व पर्यवेक्षक सुनील डाहाळके सर व विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीनि उत्कृष्ट्यरित्या गुरुपौर्णिमेनिमित्त नाट्य सादरीकरण करत गीत ,पोवाडे यांच्या माध्यमातून गुरूंची महती गायली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा धनश्री कौटकर, उपाध्यक्ष सैजल टीकाईत, प्रमुख पाहुणे प्रशंशा साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की आमच्या जीवनातील प्रवासात आयुष्यात आलेली प्रत्येक प्रिय व्यक्ती ही गुरुचे असते.गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा सत्याचा प्रवक्ता होय. असे आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले. श्वेता कोटकर, प्रिया खोडके, श्रुती मानवतकर, आपूर्वा मोरे, संस्कृती पावडे इत्यादी विद्यार्थ्यांनीनि आपले मनोगत व्यक्त करताना गुरु पोर्णिमा म्हणजे जीवनातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला गुरूंना वंदन अथवा नमन करण्याचा पवित्र दिवस. म्हणजे जगाची माऊली सुखाची सुंदर सावलीअसे मत व्यक्त केली. काही विद्यार्थिनी गीत, कविता ,चारोळीच्या माध्यमातून गुरूंच्या कार्य आणि कर्तृत्वावर प्रकाश टाकला त्यामध्ये प्रिया मोरे, देवयानी गुंजकर, श्रद्धा लिंगे, माधवी मगर, ईश्वरी खोडे, प्रशंशः साळवे, कीर्ती देशमुख इत्यादींनी समधूर स्वरामध्ये गीत कविता आणि चारोळ्या गायल्या. ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम, आर.बी. देशमुख सर, प्रा. ज्ञानेश्वर भुतेकर यांनी गुरु शिष्यांच्या परंपरेवर प्रकाश टाकला. तसेच पर्यवेक्षक सुनील डहाळके सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत असताना प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत ही गुरुमपरंपरा चालत आलेली आहे .शिषाच्या जीवनामध्ये गुरूंचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे असे सूचक विधान आपल्या मनोगतुन व्यक्त केले. शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम गुरुपरंपरेची महती सांगत असताना गुरु म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिपस्तंभ होय. गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही, ध्यान नाही, धैर्य आणि कर्म नाही ही सगळी गुरुची देण आहे. या शब्दात गुरुपौर्णिमेचे महत्त्व अनन्य साधारण असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून सानगितले. या कार्यक्रमाची नियोजन व आयोजन कू. प्रांजली लव्हडे मॅडम, व कु.मैथिली छत्रे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे लक्ष्मी गवळी व आभार प्रदर्शन दिव्या देशमुख हीने केले.
0 Response to " गुरु म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ, ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा अमूल्य स्त्रोत- प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम . "
Post a Comment