-->

30 जानेवारीला जिल्हा रुग्णालयातून  रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

30 जानेवारीला जिल्हा रुग्णालयातून रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन



साप्ताहिक सागर आदित्य 

30 जानेवारीला जिल्हा रुग्णालयातून

रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

      वाशिम,  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन 30 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अकोला नाका, वाशिम येथून करण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत 16 वर्षावरील मुला-मुलींना सहभागी होता येईल. माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक (महिला व पुरुष), कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासनाचे विविध विभाग, खेळाडू, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. स्पर्श कुष्ठरोग अभियानाअंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य “ कुष्ठरोगाविरोधात लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात ” असे आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्यांना पारितोषिक देण्यात येईल. असे आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक, वाशिम यांनी कळविले आहे.    



Related Posts

0 Response to "30 जानेवारीला जिल्हा रुग्णालयातून रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article