
12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करावे
साप्ताहिक सागर आदित्य
12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी
जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करावे
वाशिम, : सन 2022-23 शैक्षणिक सत्राचा अर्धा कार्यकाळ संपत आलेला आहे. तरी सुध्दा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित बऱ्याच विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केलेले नाही. बरेचवेळा विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव वेळेत सादर केले जात नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक कामाकरीता जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांने जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम यांच्याकडे सादर करावे. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल यांनी केले आहे.
0 Response to "12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करावे"
Post a Comment