-->

बचत गटाच्या विभागीय सरस प्रदर्शनीचा समारोप  वऱ्हाडी जत्रेने महिलांना दिली ‘नवी उमेद..!’

बचत गटाच्या विभागीय सरस प्रदर्शनीचा समारोप वऱ्हाडी जत्रेने महिलांना दिली ‘नवी उमेद..!’

 


साप्ताहिक सागर आदित्य 

बचत गटाच्या विभागीय सरस प्रदर्शनीचा समारोप

वऱ्हाडी जत्रेने महिलांना दिली ‘नवी उमेद..!’

वाशिम 

मागील तिन दिवसांपासुन वाशिम येथे सुरु असलेल्या विभागस्तरीय सरस प्रदर्शनी अर्थात वऱ्हाडी जत्रेचा समारोप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्या हस्ते झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जि प सदस्य अरविंद इंगोले, जिल्हा परिषद सदस्य  पांडुरंग ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सुनिल निकम, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनकर जाधव, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गोदारा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खारोले यांची उपस्थिती होती. यावेळी मान्वरांच्या हस्ते उत्कृष्ट बचत गटांना प्रमाण पत्र व भेट वस्तु देऊन गौरविण्यात आले.

महिला बचत गटांना अर्थ पुरवठा करणारी पतसंस्था उभारावी:  जि प उपाध्यक्ष चक्रधर गोटे 

महिलांना आर्थिकदृष्ट्या  सक्षम करण्यासाठी उमेदच्या मदतीने बचत गटांना अर्थ पुरवठा करणारी पतसंस्था अभारावी असे मत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती चंक्रधर गोटे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने वऱ्हाडी सुक्या मेव्याची निर्मिती महिला मंडळी करतात. त्याची पौष्टिकता व टिकाऊपणा या बाबी बघता त्यांची मार्केटिंग देशभर होईल अशी व्यावसायिक श्रृंखला निर्माण व्हावी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य्ार अरविंद इंगोले आणि पांडुरंग ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 


40 लाखावर विक्री झाल्याने विभागीय प्रदर्शनी यशस्वी: सीईओ वसुमना पंत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी समारोपीय कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. वाशिम येथिल नागरिकांनी तीनही दिवस या वऱ्हाडी जत्रेला मोठा प्रतिसाद दिल्यामुळे एकुण रु. 40 लाख 36 हजार एवढी विक्रमी विक्री झाली. त्यामुळे ही प्रदर्शनी शंभर टक्के यशस्वी झाली असल्याचे गौरवोद्गार काढले. 

पुढे सीईओ पंत म्हणाल्या, “वाशीम जिल्ह्याचे व जिल्हा परिषदेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने पंचवीस वर्षात प्रथमच विभागस्तरीय महिला बचत गटाचा मेळावा आयोजित करण्याचा शब्द आयुक्तांना दिला आणि जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या अधिकारी- कर्मचारी यांनी हा मेळावा यशस्वी करून आपला विश्वास सार्थ ठरविला.” 


 सर्वोत्कृष्ट स्वयं सहाय्यता बचत गट पुरस्कारित!

विभागीय प्रदर्शनी व विक्रीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या शंभराहुन अधिक बचत गटामधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या स्वयं सहाय्यता बचत गटांना समारोप प्रसंगी पुरस्कारित करण्यात आले. यामध्ये उत्पादन या प्रक्रियेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ‘सुनगावच्या महिला बचत गटाने’ प्रथम पुरस्कार पटकाविला. द्वितीय पुरस्कार उत्पादित वस्तूंना वस्तूंची टॉप मोस्ट मार्केटिंग करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील पातुर येथील ‘आसरा स्वयं सहायता समूह’ गटाने पटकाविला तर याच मार्केटिंग मध्ये तिसरा पुरस्कार वाशिम जिल्ह्यातील करडा येथील ‘महात्मा गांधी स्वयं सहायता बचत गटाने’ पटकाविला. यानंतर खानावळ प्रकारांमध्ये वाशीम जिल्हा आघाडीवर राहिला. यामध्ये जिल्ह्यातील प्रथम पुरस्कार उंबर्डा बाजार येथील ‘राणी लक्ष्मीबाई स्वयं सहायता’ बचत गटाने तर दुसरा पुरस्कार पोहरादेवी चे ‘जगदंबा स्वयं सहायता बचत’ गटाने व तिसरा पुरस्कार ऊबर्डा बाजार येतील ‘आदर्श स्वयं सहायता बचत’ गटाने पटकाविला. अकोला जिल्ह्यातील कापसी येथील पेढा उत्पादन करणाऱ्या श्वेता स्वयं सहायता बचत गटाला सुद्धा पुरस्कारित करण्यात आले. पोत्साहनपर पुरस्कार मालेगाव तालुक्यातील पिंपळशेंडा, कारंजा तालुक्यातील पसरणी, वाशिम तालुक्यातील साखरा, रिसोड तालुक्यातील जांब आढाव, मंगरूळपीर तालुक्यातील तपोवन, मानोरा तालुक्यातील रुई आणि अकोला जिल्ह्यातील गोरखवाडी व नवदुर्गा या महिला बचत गटांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बंजारा सांस्कृतिक ग्रुपने उत्कृष्ट सादरीकरण केले त्यांना सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सर्व चमुचे प्रमाण पत्र देऊन स्वागत करण्यात आले.

जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनीही समारोपीय मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख आणि उमेद अभियानाचे सर्व कर्मचारी यांनी केलेल्या कष्टामुळे आणि बचत गटाच्या महिलांच्या उत्साहाने ही वऱ्हाडी जत्रा यशस्वी झाली असल्याचे त्यांनी बोलुन दाखवले. समारोप सत्राचे व विभागीय प्रदर्शनी व विक्री करीता सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी केले.



Related Posts

0 Response to "बचत गटाच्या विभागीय सरस प्रदर्शनीचा समारोप वऱ्हाडी जत्रेने महिलांना दिली ‘नवी उमेद..!’"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article